नांदेड विभागातील यंदाच्या हंगामात ऊस गाळपाचे परवाने मिळालेल्या १७ पैकी १३ साखर कारखान्यांनी पर्यंत केलेल्या ऊस गाळपाची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास सादर केली. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील ५ पैकी ३ खासगी साखर कारखान्यांनी २ लाख २२ हजार २४५ टन उसाचे गाळप केले.
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार
सरासरी ९.४२ टक्के उताऱ्याने २ लाख ९३ हजार ३४० क्विंटल साखर उत्पादन घेतले. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक १०.१९ टक्के आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३ सहकारी आणि १ खासगी साखर कारखान्याने ३ लाख १४ हजार ९४७ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.४६ टक्के उताऱ्याने ३ लाख २९ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. शिरूर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.१२ टक्के आला.
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर
नांदेड जिल्ह्यातील ४ पैकी २ सहकारी आणि २ खासगी साखर कारखान्यांनी एकूण २ लाख ७३ हजार ६८५ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.४९ टक्के साखर उताऱ्याने २ लाख ५९ हजार ६५० क्विंटल उत्पादन घेतले. २ खासगी साखर कारखान्यांनी १ लाख ८८ हजार १७० टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.५२ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ७९ हजार ५० क्विंटल साखर उत्पादन घेतले. सिध्दी शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ९.४१ टक्के आला.
थंडी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत https://t.co/IN7XQWEcVr
— KrushiNama (@krushinama) January 13, 2020