अजून महिनाभर राहणार कांद्याचे दर तेजीत

परतीच्या पावसाचा कालावधी लांबल्याने नव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीतच सडत असल्याने महिनाअखरेरपर्यंत नवीन कांद्याची आवक अशक्य आहे. त्यामुळेच आणखी महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत. त्यानंतर मात्र काही प्रमाणात दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला.

सद्य:स्थितीत जी आवक होत आहे. तो भिजलेला कांदा आहे. त्यामुळे त्याचा दर्जा खालावलेला आहे. तरी मागणी अधिक असल्याने घाऊक बाजारात 10 किलो कांद्याला 450 ते 520 रूपये दर मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीक कांद्याची आवक सुरू होईल. बाजारात आवक वाढल्यास दरातही घट होणार असल्याचेही पोमण यांनी सांगितले.

मार्केटयार्डातील कांदा बाजारात सद्य:स्थितीत रोज 70 ते 80 ट्रकची आवक होत आहे. यातील बहुतांश कांदा जुना आहे. नवीक कांद्याची आवक अत्याल्प आहे. त्यातही 70 टक्के जुन्या कांद्याची प्रत खालावलेली आहे. केवळ 30 टक्के कांदा चांगल्या प्रतीचा आहे. 30 चांगल्या कांद्यालाच राज्यासह परराज्यातून मागणी होत आहे. त्यामुळे विदसेंदिवस कांद्याचे दर वाढत चालले आहेत. बाजारात जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, श्रीगोंदा, संगमनेर येथून कांद्याची आवक होत असल्याचेही पोमण यांनी नमुद केले.

दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र नेमकी कांद्याची काढणी सुरू असताना दोन्ही राज्यात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे जमीनीतील कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन्ही ठिकाणी अद्यापही पाऊस थांबला नसल्याने नवीक कांद्याची आवक सुरू होणे अशक्य आहे.

महत्वाच्या बातम्या –

पूरग्रस्त भागातील पिकांचे १०० टक्के पंचनामे करणार; शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊ – कृषिमंत्री

अंबड तालुक्यतील शेतकऱ्याने बाजारी, सोयाबीन टाकले जाळून

आता गोदावरी नदीचा पूर ओसरल्याने , येत्या तीन दिवसांत पंचनामे सादर करण्याचे आदेश

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे – भगत सिंह कोश्यारी