मुंबई – मागील वर्षापासून असलेल्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शाळा, कॉलेज बंद होते. मात्र सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पुन्हा एकदा शाळा, कॉलेज सुरु करण्यात आले. परंतु इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत. परंतु मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा करुन लवकरच पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
सर्व जिल्ह्यातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करत असताना जिल्ह्यातल्या शाळांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
याबाबत वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ह्या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा,त्याअनुषंगाने तयारी,लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.
वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत सांगितलं, जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास करून आदर्श शाळा योजना राबविणं. तसंच निजामकालीन शाळांचा विकास करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तसंच शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’
- कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव – दादाजी भुसे
- फळपीक विम्याचा केंद्राचा हिस्सा तातडीने देण्याची दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना केली मागणी
- जागतिक दर्जाशी स्पर्धा करणारे विद्यार्थी घडवावेत – अजित पवार