उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते.
पावसाळात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फूलांची गळ जास्त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते. उत्पादनही भरपूर येते. तापमानातील तफावतीमुळे फळे फुले गळ मोठया प्रमाणात होते. व उत्पन्नात घट येते. बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास चांगली होते.
पाण्याचा उत्महिन्यातम निचरा होणा-या ते मध्यम भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रीय खते वापरल्यास मिरचीचे पिक चांगले येते पाण्याचा योग्य निचरा न होणा-या जमिनीत मिरचीचे पिक घेऊ नये.
पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्हाळयात मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी! ‘या’ जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल ५० टक्क्यांनी घट
- काळ्या मानेपासून ५ मिनिटात मिळवा मुक्तता, जाणून घ्या घरगुती उपाय….
- ‘या’ जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ९७८ नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण
- मोठी बातमी – महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत लॉकडाऊन, जाणून घ्या काय सुरु, काय बंद राहणार?
- देशव्यापी लॉकडाऊन लावल्यास कोरोनाची साखळी तुटेल; टास्क फोर्सचा केंद्र सरकारला सल्ला