टोमॅटो पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान

टोमॅटो हे उष्ण हवामानातील पिक असले तरीही महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. अति थंडी पडल्यास टोमॅटोच्या झाडाची वाढ खुंटते. तपमानातील चढउताराचा फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. 13 ते 38 सेल्सियस या तापमानास झाडाची वाढ चांगली होती. फूले आणि फळे चांगली लागतात.

रात्रीचे तापमान 18 ते 20 सेल्सियस दरम्यान राहिल्यास टोमॅटो ची फळधारणा चांगली होते. फळांना आकर्षक रंग आणणारे लायकोपिन हेक्टरी रंगद्रव्य 26 ते 32 सेंटिग्रेडला तापमान असताना भरपूर प्रमाणात तयार होते.

तापमान, सुर्यप्रकाश आणि आद्रता यांचा एकत्रित परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. 20 ते 32 अंश सेल्सिअस तापमान, 11 ते 12 तास स्वच्छ सुर्यप्रकाश आणि 60 ते 75 टक्के आर्द्रता असेल त्यावेळी टोमॅटो पिकाचे चांगले उत्पादन मिळते.

टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमिन लागवडी योग्य असते. हलक्या जमिनीत फळे लवकर तयार होतात, पाण्याचा निचरा चांगला होतो. आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर पवुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्याची सोय असावी लागते. जमिनीचा सामू मध्यम प्रतिचा म्हणजे 6 ते 8 असावा.

महत्वाच्या बातम्या –