दुधी भोपळा लागवड कशी करावी, जाणून घ्या

दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ‘यथा नाम तथा गुण’ या उक्तीप्रमाणे दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते.

लागवड –

दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे. लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी. मंडप पद्धतीने 3 मीटर x 1 मीटर अंतराने लागवड करावी. लागवडीपूर्वी मातीपरीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र द्यावे. प्रतिहेक्‍टरी 2.5 किलो बियाणे लागते. लागवडीसाठी सम्राट ही जात निवडावी.

हवामान आणि जमीन –

दुधी भोपळयाची लागवड खरीप आणि उन्‍हाळी हंगामात केली जाते. हे पिक उष्‍ण आणि कोरडया हवामानात उत्‍तम येते. मध्‍यम ते भारी जमिनीत हे पिक उत्‍तम येते.

पिकाचा कालावधी –

१८० ते २०० दिवस

महत्वाच्या बातम्या –