जाणून घ्या, मीठ खाण्याचे फायदे व तोटे…

खूपदा मीठ कमीत कमी खाण्याचा सल्ला देत असतात. मिठाशिवाय तर आपले काहीही चालत नाही आणि मीठ जास्त झाले तर त्याचे शरीरावर दुष्परिणामही होतात. तर मग काय करावे? मीठमिरची, मीठभाकरी, मिठाला जागणे, नावडतीचे मीठ अळणी इत्यादी प्रकारे मीठ शब्द रोजच्या जीवनात आहाराव्यतिरिक्त सारखा वापरात येत असतो. मिठावाचून कोणाचेच चालत नाही इतके महत्त्व मिठाला आहे. मसाल्याच्या पदार्थात मीठ हे पाहिजेच. मीठ नाही म्हणजे सर्व बेचव. हिंदी भाषेत मिठाला ‘सबरस’ किंवा सर्व रसांचा राजा म्हणतात. चला तर जाणून घेऊ फायदे व तोटे….

मिठाचे फायदे….

  • जर तुमच्या शरिरावर मधमाशीने डंख केला असेल तर वेदना होणार्‍या जागेवर मीठ लावा. वेदना आणि सूज.. दोन्हीही गुल होतील.

  • कधी कधी दिवसभरातील कामाच्या अतिरेकात डोळ्यांना ताण आणि थकवा जाणवतो. अशावेळी कोमट मीठाच्या पाण्यात एखादं स्वच्छ कापड भिजवा, आणि ते डोळ्यांवर ठेवून काहीवेळासाठी आराम करा. डोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी हे तुम्ही दररोज केलं तर चांगलंच आहे.

  • मीठाचा वापर दातांच्या स्वच्छतेसाठी होतो हे तर आपल्याला माहितीच आहे. एक भाग मीठ आणि दोन भाग बेकींग सोडा वापरून तयार केलेली पेस्ट तुमच्या दातांना शुभ्र आणि चमकदार बनवेल. मीठामुळं आपल्या हिरड्याही मजबूत होतात. तेंव्हा दातांसाठी रोज मीठ जरूर वापरा.

मिठाचे तोटे….

  • अतिप्रमाणात मीठ खाल्यास ऑस्टिओपोरोसिस, मुतखडे, हाय बीपी, किडनीचे गंभीर आजार होतात.
  • अतिप्रमाणात मीठ घेतल्याने लठ्ठपणा हे कारण असता. लठ्ठपणामुळे रक्तदाब, ह्रदयविकार, मधुमेह, झोपेचे विकार यासारखे आजार होतात. यामुळे वजनही पटकन वाढतं.
  • जास्त मीठ सेवन केल्यास तहान कमी होऊन भूक वाढते.शरीरात अनावश्‍यक पाणी केवळ मिठाच्या अतिप्रमाणामुळे साठून राहते.

महत्वाच्या बातम्या –