संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.
आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात.
- कडलेल्या अंड्यात बर्याच प्रकारची प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराचे वजन वाढण्याबरोबरच शरीरही मजबूत बनते.
- दररोज उकडलेले अंड्याचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन चांगल्या प्रमाणात वाढू शकते.
- उकडलेल्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए बी आणि सी सारखी आवश्यक पोषकतत्वे असतात, जे आपल्या डोळ्यांची दृष्टी तेज करण्यास, वाढविण्यास उपयुक्त आहेत.
- उकडलेल्या अंड्यात फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात आढळतात, जे शरीरातील १५ प्रकारच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी मदत करतात.
- बर्याच लोकांना उकडलेले अंडे खायला आवडते आणि तर काही लोकांना अंडी तळून खाणे आवडते. परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तळून खाल्लेले अंडे हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. कारण अंडी तळण्याने त्यातील सर्व गुणधर्म नष्ट होतात.
महत्वाच्या बातम्या –