पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. कच्चा पेरू वरुन हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असतो. नंतर गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचे ही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला guava म्हणतात. तर हिंदीत अमरुद, जाम या नावाने ओळखले जाते.
कच्चा पेरू कडक तर पिकल्यावर मऊ होते. हे तर पेरूचे आपल्याला माहित आहे पण यासोबतच पेरूची पाने देखील आपल्याला खूप उपयोगी ठरतात. त्याचे देखील आपल्याला अनेक फायदे आहेत. आपल्याला त्वचेच्या समस्यावर देखील याचा खूप फायदा होतो. तारुण्य टिकवण्यासाठी पेरूचे अनेक फायदे आहेत. दातांचे आणि संपुर्ण शरीराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी पेरू फायदेशीर ठरतो.
चला तर मग जाणून घेऊयात पेरूच्या पानांचे आपण कधीही न ऐकलेले हे फायदे –
- पोटासंबंधी आपल्याला काही समस्या उद्भवल्यास पेरूच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. पचन संस्थेवर याचा परीणाम होऊन पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. एक कप पाण्यात पेरूची पाने टाकून ती उकळून आणि त्याचा रस गाळून तो प्यायल्यास फरक जाणवतो. त्यामुळे आपल्याला पेरूच्या पानांचा पोटासाठी देखील फायदा होतो.
- पेरुचे पान कढीपत्त्यासोबत मिक्स करुन पांढरे केस घालवता येतात. ४-५ पेरुचे पाने आणि मुठभर कढीपत्ता पाण्यात उकळून या पाण्याने डोके धुवा. केसांना फायदा होतो.
- तसेच पेरूच्या पानांचा रस जर आपण रोज घेतला तर आपल्या रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यासाठी देखील मदत होते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी देखील पेरूच्या पानांचे सेवन उपयुक्त ठरते.
- पेरुचे पान आणि लिंबूचा रस एकत्र करून केसांना लावल्याने कोंडा दूर होतो. मुठभर पेरुची पाने बारीक करुन पावडर तयार करा. यामध्ये २-३ लिंबूचा रस मिसळून डोक्यावर लावा आणि २० मिनिटांसाठी तसेच राहू द्या. या उपायाने कोंडा दूर होतो.
- शरीरातील गाठींवर पेरुच्या पानांची पेस्ट करुन ती लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. शरीरात विविध कारणांनी झालेल्या गाठींवरील उपाय म्हणूनही पेरुच्या पानांचा वापर केला जातो.
- जर आपल्याला लठ्ठपणा कमीकरायचा असेल तर यासाठी पेरुची पानं आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहेत. पेरूच्या पानांचे चूर्ण घेतल्यास शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होण्यात मदत होते. शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचे चूर्ण उपयुक्त ठरते.
- जर आपण ही पेरूची पाने पाण्यासोबत उकळून पिले तर दातांचे आरोग्य उत्तम राहते. दातांच्या समस्यांसाठीही पेरुच्या पानांची पेस्ट उपयुक्त असते. दातांच्या मजबूतीसाठी महत्त्वपुर्ण पर्याय आहे.
- बऱ्याचदा स्त्रीयांना अंगावरुन पांढरं पाणी जाण्याचा त्रास असतो. पेरुची पाने या समस्येसाठीही अतिशय गुणकारी ठरतात. रोज सकाळ संध्याकाळ पेरूच्या पानांचा रस घेतल्यास ही समस्या कमी होण्यासाठी फायदा होतो.
महत्वाच्या बातम्या –