दूधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असत, त्यामुळे दूध पिण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. सर्दी-खोकला झाल्यास अथवा डोके दुखल्यास हळदीचे दूध आवर्जून पिले जाते.तुम्हाला थकवा जाणवत, असेल अथवा अशक्तपणा आला असेल तर, अशा वेळी हळदीचे दूध पिल्याने चांगला फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊ फायदे…
- सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. थंडीमध्ये हळदीचे दूध प्यायल्याने यापासून तुमचा बचाव होतो.
- शरीराचा कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो. अशा वेळेस रोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायल्याने फायदा होतो.
- दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.
- जर तुम्हाला एखाद्या कारणामुळे जखम झाली तर त्याठिकाणी हळद हे अँटीबॅक्टेरिअल म्हणून काम करतं. हळद बॅकटेरिया मारण्यासाठी मदत करतं
- दूध प्यायल्याने त्वचेत एक चमक निर्माण होते. दुधासोबत हळदी सेवन केल्याने त्वचेच्या विकारापासूनही बचाव होतो. खाज, इंफेक्शन या सारख्या गोष्टींपासून संरक्षण होते.
- आयुर्वेदात हळदीला महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.
- श्वास घेण्याबाबात ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यास मदत होती. फेफडा, कफ यावर तत्काळ आराम पडतो.
महत्वाच्या बातम्या –