जाणून घ्या राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे

‘राजगिरा’ आपल्याला नवरात्री, एकादशी अशा उपवासांना आठवतो. पण एवढा मर्यादीत त्याचा ऊपयोग आहे का??? नक्कीच नाही. राजगिरा ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. राजगीऱ्यास रामदाना,अमरनाथ म्हणुनही ओळखले जाते. अमेरीकेतून भारतात आलेली ही वनस्पती आहे. धान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे तिपटीने अधिक असते. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते.

राजगिऱ्यात विशेषतः प्रथिने, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिज द्रव्ये यांचे प्रमाण भरपूर आहे. राजगिऱ्यात असणाऱ्या कॅल्शिअमचे प्रमाण पारंपरिक तृण धान्यांपेक्षा साधारणपणे १० पट जास्त आहे. राजगिरा पौष्टिक आहे शिवाय त्यामध्ये ग्लुटेन नसते. इतर पारंपरिक धान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यात विशेषतः प्रथिने, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिज द्रव्ये यांचे प्रमाण भरपूर आहे. राजगिऱ्यात असणाऱ्या कॅल्शिअमचे प्रमाण पारंपरिक तृण धान्यांपेक्षा साधारणपणे १० पट जास्त आहे; तर लोहाचे प्रमाण ५ पट जास्त आहे.

पोषकता 

  •  कॅल्शिअम घटक मुबलक असतात. त्यासोबतच मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फोलिक अ‍ॅसिड आणि लोहदेखील मुबलक आढळते.
  •  सोल्युबल फायबर, प्रोटीन आणि झिंक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
  • लोह मुबलक असल्याने अ‍ॅनिमियाचा त्रासही आटोक्यात राहतो.
  • धान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम तिपटीने अधिक असते. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते. तसेच ऑस्टोपोरायसिसचा धोका आटोक्यात राहतो.
  • यातील तेल आणि फायटोस्टेरॉल घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉलची पातळीही कमी करते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • केस अकाली पांढरे होण्याची समस्या आटोक्यात राहते. यातील लाएसिन घटक केसांना मुळापासून बळकट बनवतात. तसेच सिस्टीन घटक केसांना आवश्यक असणारे प्रोटीन घटक मिळवून देण्यास मदत करतात.
  •  यातील पेप्टाइड्स घटक दाह कमी करतात; तसेच वेदना कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

बाजार समित्यांमध्ये मुगाच्या दरात वाढ

बी- बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी