मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात माल खराब झाला. द्राक्ष निर्यातीत एकट्या नाशिक जिल्ह्याचा ९१ टक्के वाटा आहे. मात्र अतिवृष्टी आणि हवामान बदलांचा द्राक्षांना चांगलाच फटका बसला आहे. परिणामी, नाशिकमधून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत ५७ टक्के इतकी घट झाली आहे.
द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक
त्यांनतर डिसेंबर महिन्यात द्राक्ष निर्यात सुरळीत होण्याची चिन्हे असताना नोव्हेंबरच्या अतिवृष्टीमुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे या वर्षी जिल्ह्यातून परदेशात होणारी द्राक्ष निर्यात निम्म्यावर आली आहे.
गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट
युरोपियन देशांसह रशिया व दुबई मार्केटला मोठी मागणी आहे; मात्र घटलेली उत्पादकता, मालाची नासाडी व घसरलेल्या प्रतवारीचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. त्यामुळे चालू हंगामातील उभ्या असलेल्या पिकाचा अंदाज पाहता निर्यातीसाठी द्राक्ष कमी उपलब्ध होतील, मात्र उपलब्ध चांगल्या मालाला दर मिळेल, असे सांगण्यात येत आहे.
दूध संघाच्या एकूण व निव्वळ नफ्यात वाढ – हरीभाऊ बागडे https://t.co/3ok3KJa1Vo
— KrushiNama (@krushinama) January 28, 2020