अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा

कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा कायम आहे. आठवडाभरात ९५ क्विंटल लसणाची आवक होऊन प्रतिक्विंटल ८००० ते ९००० व सरासरी ८५०० रुपये दर मिळाला. तर, गवारीची ८६ क्विंटलची आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपये व सरसरी ५००० रुपयांचा दर मिळाला. टोमॅटोची ३५४ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. फ्लॉवरची २७८ क्विंटलची आवक होऊन ४०० ते ८०० रुपये व कोबीची ३६५ क्विंटलची आवक होऊन ३०० ते ५०० रुपयांचा दर मिळाला.वांग्यांची २९० क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये मिळाले.

नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट

दोडक्यांची १४९ क्विंटलची आवक होऊन २००० ते २५००, वालाची ७६ क्विंटलची आवक होऊन २००० ते २५००, घेवड्याची १०३ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २५००, डिंगरीची २५ क्विंटलची आवक होऊन २००० ते २५०० व बटाट्याची ४१२० क्विंटलची आवक होऊन १५०० ते २५०० रुपयांचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवकही बऱ्यापैकी होत आहे. तिची २६७ क्विंटलची आवक होऊन १२०० ते २२००, शेवग्याची ८३ क्विंटलची आवक होऊन ३५०० ते ४००० रुपयांचा दर मिळाला.

जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये

मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू, कढीपत्ता यालाही चांगली मागणी राहिली. ओला हरभरा, मका कणसे, मुळा, चवळी, चुका, वाटाण्याचीही आवक होत आहे, असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले.