कोल्हापूर पट्टणकडोलीसह पाच गावांसाठी नळ योजनेवर 2001 ते 2019 मध्ये योजनेत उपसा पंप आणि देखभाल दुरुस्तीसाठी 83 लाख 2 हजार 200 रुपये तर देखभाल दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 86 लाख असे संपूर्ण 1 कोटी 69 लाख 2 हजार 200 रुपये खर्च केले आहेत.
भाजपने फक्त भाषणं केली, कर्जमाफी नाही – जयंत पाटील
तसेच कोल्हापूर पट्टणकडोलीसह पाच गाव नळपाणी पुरवठा योजनेत वेळोवेळी बदल होत होते. बदललेल्या वस्तूंचा साठा हा 50 टनांहून अधिक अपेक्षित होता. पण फक्त 5 टनांची विक्री दाखवून ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर न्याय न मिळाल्याने तक्रारदारांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली. शेवटी लोकांनी मागितलेल्या न्यायाला यश मिळाल्याचे तक्रारदारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अतिवृष्टीचे अनूदान अद्याप न मिळाल्याने धारूरमधील शेतकरी हैरान
तसेच अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती तेव्हा अधिकाऱ्यांनी आर. जी. पाटील यांची नेमणूक चौकशी गटविकास अधिकारी केली. पण आर. जी. पाटील यांनी किती वस्तू विकल्या व शिल्लक किती तसेच खरोखरच त्या खराब होत्या काय हे अहवालात न सांगताच ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे ग्राह्य मानून त्यांना अभय दिले आहे. यामुळे तक्रारदारांनी लोकायुक्तांकडे लोकप्रतिनिधींवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून रक्कम वसूल करावी व त्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी पाहायला मिळतील ; घ्या जाणून …..
आता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात
सरकारने शेतकऱ्यांच्या ‘नाईटलाइफ’ची चिंता करावी – देवेंद्र फडणवीस