मराठीतलं अधिकाऱ्यांना कळंना आणि इंग्लिश-हिंदी शेतकऱ्यांना येईना 

कुंभार पिंपळगाव येथे वर्ष 1973 पासून बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. 40 खेड्यासह परिसरातील हजारो ग्राहक या शाखेशी जोडलेले आहेत. पण याच बँकेमध्ये अमराठी अधिकारी आहे. परंतु या अधिकाऱ्याला मराठी समाजात नसल्याने शेतकरी आणि ग्राहकांना हिंदी आणि इंग्रजीत बोलावे लागत आहे. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांचे बोलणे लोकांना समजत नाही आणि लोकांचे बोलणे त्या अधिकाऱ्याला समजत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; तूर खरेदी केंद्र कधी उघडतील याची शाश्वती नाही

मराठीतलं त्यांना कळंना आणि इंग्लिश-हिंदी आम्हाला बोलता येईना अशी शेतकऱ्यांची गत झाली आहे. या प्रकारामुळे मात्र बॅंकेचा कारभार सुधारण्याऐवजी बिघडत असल्याचे चित्र आहे. तसेच या शाखेचे शाखाव्यवस्थापक आंध्रप्रदेशचे, उपशाखा व्यवस्थापक हरियाणाचे तर दुसरे उपशाखा व्यवस्थापक मध्यप्रदेशचे आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेकडून हातपंप दुरुस्तीसाठी ५० लाख, पाइप खरेदीसाठी ४१ लाख रुपयांचा निधी

या सर्व प्रकारामुळे दररोज बॅंकेत वाद होतात. शाखेत खेड्यातील, ग्रामीण भागातील कमी शिक्षित अनेक जणांचे व्यवहार आहेत तर अनेक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे वर्षभरापासून ठप्प आहेत. येथील शाखेत मराठी समजणारे अधिकारी द्यावेत अशी शेतकरी व ग्राहकांची मागणी आहे.

महत्वाच्या बातम्या –

भुईमूगाच्या बियाण्याच्या शासनस्तरावर अनुदान देण्यात संदर्भात संभ्रम निर्माण

‘उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही’- राजू शेट्टी