इस्राईल पद्धतीने केली पेरू लागवड; दोन एकरांतून कमावले ३६ लाख

शेतकरी हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. अनेक नाविन्यपूर्ण व भक्कम उपाययोजनांतून हा कणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.  भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यांतील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे.

साधासुधा नाही हा तर महाघोटाळा; घोटाळा करताना मृत शेतकऱ्यालाही सोडलं नाही!

पण गेल्या कघी दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे शेतकरी हा नेहमी अडचणीत सापडतो. निसर्गाची वारंवार हुलकावणी  , शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे खचून जातो. पण यातून सावरून एका शेतकऱ्याने तब्बल ३६ लाखांचे पेरू पिकाचे उत्पादन घेतले आहे. बार्शी तालुक्यातील कुसळंबपासून चार किलोमीटरवर वाणेवाडी हे गाव आहे. तेथील हा शेतकरी आहे. खंडेराव दत्तात्रेय लवांड असे त्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. गावातील संपूर्ण शेतकऱ्यांचा कल हा सीताफळ लागवडीकडे आहे. परंतु खंडेराव लवांड यांनी आपल्या पत्नी जयश्रीच्या मदतीने शेतात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.  खंडेराव लवांड यांनी सीताफळाला फाटा देत दोन एकरांत थाई वाणाच्या पेरुची लागवड केली व या लागवडीतून त्यांनी एकरी १८ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

आता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात

पण या पिकासाठी त्यांनी सर्वात प्रथम सात किलोमीटर अंतरावर बाभळगाव येथील विहिरीतून पाईपलाईन करुन पाण्याची व्यवस्था केली. खंडेराव लवांड यांनी शासनाचे कोणतेही अनुदान न घेता दोन वर्षांपूर्वी या पिकाची लागवड केली. यात त्यांना खूप मोठे यश मिळाले. त्यांनी पहिल्याच वर्षी एकरी सहा लाखांचे उत्पादन मिळवले. त्यांना अतिशय कमी खर्च आणि कमी मनुष्यबळात सीताफळापेक्षाही दुपटीने उत्पादन मिळाले.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, ६० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्र

या लागवडीसाठी त्यांचे ५० हजार हे मशागत आणि फवारण्यांसाठी तर ५० हजार रुपये मजुरीवर खर्ची झाले. तसेच त्यांनी सांगितले की पेरूच्या झाडांना कॅल्शियम पोटॅश मायक्रोन्यूबची आवश्यकता असते. या पेरूच्या बागेवर भुरी व मिलीबग हे रोग पसरतात. या फळात बिया नरम असतात हे या फळाचे वैशिष्ट्य. पेरूचे वरील आवरण जाड असल्याने हे फळ काढणीनंतर जवळपास २० दिवस टिकून राहते. तसेच त्यात गराचे प्रमाण जास्त असून, चवीला अतिशय गोड आहे. या पेरुची विक्रीही सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे.

राज्यात ८ ठिकाणी शुल्क नियामक समित्या; एक पुनरीक्षण समिती स्थापण्यास मान्यता – शिक्षणमंत्री

तसेच मात्र एका एकरावरील लागवडीला सरासरी एक लाख रुपये खर्च आला. त्र्याचप्रमाणे ही पेरूची लागवड कशी करावी हे ही त्यांनी सांगितले आहे. दोन ओळींमधील अंतर दहा फूट तर दोन झाडांमधील अंतर पाच फूट राखून पेरुची लागवड केली. एका एकरात ८०० रोपे लावली. ही सर्व लागवड इस्राईल पद्धतीने केली. त्यांनी दोन एकरांत १६०० रोपे लावली. केवळ सहा महिन्यांतच फळधारणा होण्यास सुरुवात झाली. झाडं एक वर्षाची झाली आणि प्रत्येक झाडाला ४० ते ४५ किलो उत्पादन निघाले. दुसऱ्याच वर्षी प्रत्येक झाडाला किमान १०० किलो माल निघाला. सुरुवातीला दर ६० रुपये असा मिळाला.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे मानसिक नैराश्य, 24.7 टक्के शेतकरी नैराश्यग्रस्त

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; मोदी सरकारचा मोठा निर्णय ,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार