शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, ६० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्र

भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात बारा कोरा व्हावा, या मागणीसाठी थेट राज्यपालांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, या मागणीसाठी कोल्हापूरमधील ६० हजार शेतकऱ्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे.

कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी पाहायला मिळतील ; घ्या जाणून …..

ही पत्रे घेऊन समरजीतराजे घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे काहींनी तर स्वत:च्या रक्ताने आपली व्यथा मांडली आहे.ही पत्र आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत.

डागरहित त्वचा हवी आहे?? तर मग पाण्यात मिसळा ‘हे’ पदार्थ

दुसऱ्या बाजूला अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, सातबारा कोरा कधी करणार, सरकारने उत्तर द्यावं, विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची मागणी केली आहे. विधानसभेचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराबाबत चर्चा करावी अशी मागणी फडणवीस यांनी विधानसभेत केली.

‘ठिबक’ अनुदानाचा अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत

या दोन्ही विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र प्रश्नोत्तरांचा तास झाला पाहिजे, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. फडणवीसांचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये येत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच सध्या विधानसभेचे कामकाज सुरू होते. पण, गदारोळ वाढल्याने सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले.

कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणास शुभारंभ

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्जमुक्तीचं दिलेलं वचन पूर्ण करावं या मागणीसाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. आज राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

महाविकासआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत दिली नाही, फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. या राज्य सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Good news ; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद

चांगली बातमी ; आता सातबाऱ्यावर होणार चंदनाची नोंद