नवी दिल्ली – देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी (Vaccination) आजपासून म्हणजेच १ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. यासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. तर नोंदणीसाठी इयत्ता दहावीचे ओळखपत्रदेखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
दरम्यान येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल वेगळी असणार आहे.
भारत सरकारने लहान मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे.भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila’s ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. दरम्यान रजिस्ट्रेशनसाठी पूर्वीसारखीच पद्धत वापरली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल अशा विध्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे ओळखपत्र देखील वापरता येणार आहे. https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट; शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार ‘इतके’ रूपये
- ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू; जाणून घ्या नवी नियमावली
- घोळ मासा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !
- ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाल्याने ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल – अजित पवार
- शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – बच्चू कडू