शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर; 15 हजार लाभार्थ्यांचा समावेश
दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे, ते पूणपणे माफ होणार असून त्याच्या सातबारावरून ही पीककर्ज काढून टाकलं जाणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. दोन लाखांपेक्षा वर असलेल्या कर्जदारांसाठी आणि विशेषत: जे नियमित कर्ज फेडत आहेत त्यांच्यासाठी लवकरच योजना जाहीर करून ती अंमलात आणली जाईल अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यासोबतच शेतकरी स्वतःच्या पायावर कसा उभा राहिला पाहिजे, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
Good news ; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद
तसेच त्यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी ही २४ फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. त्यामध्ये ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्ज खाती जाहीर करण्यात आली होती. कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी ही राज्य सरकारने शनिवारी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये २१ लाख ८२ हजार जणांचा समावेश आहे. २१ लाख ८२ हजार कर्जमुक्ती योजनेतील या दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या दुसऱ्या यादीनंतर राज्यात आतापर्यंत २१ लाख ८२ हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर करण्यात आल्या आहेत.
पाच वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले, ते पाहावे – अमोल कोल्हे
आतापर्यंत राज्यातील एक लाख ४२ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. तसेच सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या –
शेतकऱ्यानं केला चमत्कार; ४० दिवसांत कलिंगडामधून तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचं उत्पन्न