राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची योजना लागू केली असली तरी शेतकऱ्यांच्या आयुष्यातील फरफट थांबू शकलेली नाही. शेतकरी आत्महत्येच्या घटना आजही सुरूच आहेत. पाथर्डी तालुक्यातील ताजी घटना तर मन सून्न करणारी आहे. ज्या मुलाने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केली त्याच मुलाचं पितृछत्र हरवलं. या घटनेने सारेच हेलावले आहेत. अहमदनगरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तिसरीतला मुलगा शाळेत काव्यवाचन स्पर्धेत ‘अरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर करतो आणि त्यानंतर त्याच दिवशी अवघ्या दोन तासांनी या मुलाचेच शेतकरी वडील आत्महत्येचं पाऊल उचलतात.
हे सरकार जनतेच्या विरोधात झालेले असून ते उधारीवरचे सरकार आहे – हर्षवर्धन पाटील
पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे ही घटना घडलीअसून येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये काव्यवाचन कार्यक्रमात तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केली आणि त्याच दिवशी त्याच्या वडिलांनी विष घेऊन आत्महत्या केली. प्रशांत बटुळे या मुलाने शाळेमध्ये ही कविता सादर केली. अवघ्या दोनतासानंतरच त्याच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यावेळी वडील आपले खूप लाड करायचे, त्यांनी आत्महत्या का केली हेच या चिमुकल्याला सांगणं कठीण झालंय. त्याने केलेली ही कविता काळीज पिळवटून टाकणारी आहे.
शेतकऱ्यांची दुसरी कर्जमाफीची यादी उद्या जाहीर करणार
शेतात कष्ट करूनही तुझ्या डोक्याला ताप,
आरे बळीराजा नको करू आत्महत्या,
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकर,
कसे उन्हात करतात शेती,
पीक उगवणी मिळतात पैसे,
शेती करूनही तुझ्या हाताला फोड,
आरे बळीराजा नको करू आत्महत्या
शेतकरी कर्जमाफीची नगर जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर – दिग्विजय आहेर
मल्हारी बटुळे यांनी डोक्यावर कर्जाचा बोजा आणि नापिकीमुळे आलेली निराशा यामुळे आत्महत्या केल्याचं त्यांच्या घरचे सांगताहेत. तिसरीत शिकणाऱ्या आपल्या मुलाची ही कविता एकदा तरी या शेतकरी बापाने ऐकायला हवी होती. शेतकरी आत्महत्येचा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र मुलाने अरे बळीराजा नको करू आत्महत्या अशी कविता करणं आणि त्यानंतर बापानं आत्महत्या करणं यापेक्षा दुर्दैवं ते काय..?
महत्वाच्या बातम्या –
चांगली बातमी ; आता सातबाऱ्यावर होणार चंदनाची नोंद
सत्तेत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी हे सरकार तर नौटंकी करीत आहे – अजित पवार