पपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पपईच्या फळापासून टूटी फ्रुटी, पपई प्युरी, पपई पावडर, बेबी फूड्स ई प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊ पपई लागवडीतील विशेष काळजी
- रोपे अर्थ सावलित ठेवा, रोज पाणी घालावे.
- सांगितलेल्या आंतरावर लोल सऱ्या कराव्यात.
- सऱ्या ओलाव्यात.
- दोन रोपातील आंतरावर खुणा कराव्यात.
- लागवडीपुर्वी रोपाना बुरशीनाशकाच्या द्रावणाची आळवणी करावी.
- लागवडीसाठी सायंकाळची वेळ निवडावी.
- लागवड करावयाच्या जागी छोटा खड्डा घेवुन, रोपांची पिशवी काढुन रोप सरळ व ओळीत लावावे, रोपाभोवतीची माती पायाने दाबावी रोज थोडे-थोडे पाणी घालावे. परत 2-3 दिवसांनी रोपाभोवतीची माती दाबावी.
- पपई बाग सदैव तणविरहित ठेवावी.
- दोन्ही बाजुने आंतरमशागत करुन वापरातली माती भुसभुशीत ठेवावी.
- लागवडीनंतर दर महिन्यात एक या प्रमाणे बुरशी नाशकाची आळवणी द्यावी, आवश्यकता भासल्यास परत-परत करावी.
- झाडाच्या बुंध्याच्या प्रत्यक्ष पाण्याशी संबंध येणार नाही या बाबत दक्षता घ्यावी.
- ठिबक संचाने पाणी देणार असाल तर पिक अवस्थेनुसार 1 ते 10 लिटर पाणी रोज द्यावे. (स्थळनिहाय पाण्याची मात्रा बदलेल) ठिबक नळ्या पिंक वाढीच्या अवस्थेनुसार झाडापासुन योग्य अंतरावर ठेवावे.
रासायनिक व सेंद्रिय खत व्यवस्थापन
1) प्रती झाडास किमान 10 किलो चांगले कुजलेले शेणखत द्यावे. कदम उपलब्ध नसल्यास दोन वेळा विभागुन द्यावे.
2) सुक्ष्मअन्नद्रव्याची जमीनीत कमतरता भासल्यास फवारणीतुन द्यावेत.
3) शिफारसीत खत मात्रा.
प्रती झाड 200 ग्रॅम नत्र + 200 ग्रॅम पालाश असुन ती सारख्या 4 भागात विभागुन (प्रत्येक वेळी 50:50:50 ग्रॅम नत्र:स्फुरद:पालश म्हणजेच प्रतीझाड 110 ग्रॅम युरिया+313 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट+81 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.) खते लागवडीनंतर रोपे स्थिरावल्या नंतर 1 महिन्याच्या आत दुसरा हप्ता लागवडीनंतर 3 महिन्यांनी, तिसरा हप्ता 5 महिन्यांनी व अखेरचा हप्ता 7 महिन्यांनी द्यावा.
- बागेतील रोपास मातीची भर लावावी.
- बागेभोवती संजिव कुंपण करावे.
पपईचे पिक संरक्षण –
1) मावा, तुडतुडे, मिलीबग या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो. योग्य ला शिफारसीत व उपलब्ध किडनाशकांचा वापर करावा. तशी नोंद ठेवावी.
2) बुरशीजल व विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा रस शोषणाऱ्या किडी मार्फत होतो. त्यांचे नियंत्रण करावे. योग्य ला शिफारसीत बुरशी नाशकाचा योग्य मात्रेत वापर करावा.
- झाडांना आधार द्यावा.
- अति जास्त तिव्र सुर्यप्रकाशामुळे फळांवर चट्टे पडतात, ते पडु नये म्हणुन लावर पेपर, पॉलिथीन बॅगस वापर करुन झाकावेत.
- डोळा पडलेली फळाची काढणी करावी.
महत्वाच्या बातम्या –