Share

…….म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं!

सध्या कांदा (Onion) हा सगळ्यांच्याच डोळ्यातून पाणी काढत आहे. कांद्याचे दर आभाळाला भिडले आहेत. आता कांदा १०० ते १२० रुपये किलोच्या आसपास पोहोचले आहेत. पण असा देखील कांदा (Onion) आपल्या डोळ्यातून पाणी काढतोच. कधीही कुणीही कांदा (Onion) कापला तर त्याच्या डोळ्यातून पाणी का येत? या मागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत.

कांदा हा अनेक पापुद्रांनी बनलेला असतो. यामध्ये प्रॉपेंथियल-एस-ऑक्साइड नावाचं रसायन असतं. हे रसायन कांदा कापताना आपल्या डोळ्यातील लेक्राइमल ग्लँडला उत्तेजित करतात. ज्यामुळे आपल्या डोळ्यातून कांदा कापताना पाणी येतं. बाष्पनशील असलेल्या या रसायनाचे रुपांतर वायूत होतं. हा वायू थेट डोळ्यात जातो. या वायूतील सलफ्युरिक ऍसिड डोळे चुरचुरण्यास कारणीभूत असतात. यामुळे डोळ्यातून पाणी येते. पण यामुळे डोळ्यांना कोणताही त्रास होत नाही उलट यामुळे अधिक डोळे मोकळे होतात.

अनेकांना कांदा कापताना अतिशय त्रास होतो. अशावेळी खालील उपाय करा

1. कांदा कापल्यावर वाहत्या पाण्याखाली म्हणजे नळाखाली धरा

2. कांदा (Onion) कापताना सर्वात प्रथम खालचा पांढरा भाग काढून टाका

3. कांदा कापण्यापूर्वी 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा

4. कांद्याचे (Onion) दोन भाग केल्यानंतर पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवून ठेवा

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon