मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मूर्त स्वरूप घेत असलेल्या स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार (Sugarcane workers) कल्याण महामंडळाला सर्व सहकारी व खाजगी कारखान्यातील ऊस गाळपावर प्रति टन दहा रुपये प्रमाणे ऊसतोड कामगार (Sugarcane workers) कल्याण निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
सहकारी किंवा खाजगी साखर कारखान्याने ऊस खरेदी केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफआरपीच्या रक्कमेतून एकही रुपया कपात न करता संबंधित कारखान्याने त्यांचे नफा-तोटा खाते दर्शवून त्यातून ही रक्कम जमा करावयाची आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा कुठलाही भार सहन करावा लागणार नाही, असे या शासन आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून 31 डिसेंबर पर्यंत झालेल्या गाळपावरील रक्कम 15 जानेवारी पर्यंत जमा करावी तसेच 1 जानेवारी पासून ते गळीत हंगाम संपेपर्यंत होणाऱ्या गाळपावरील रक्कम हंगाम संपल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्या कारखान्यांना जमा करावी लागणार आहे. असे दोन टप्प्यात कारखान्यांकडून निधीचे संकलन करण्यात येईल.
सहकार विभाग व राज्य साखर आयुक्त हे प्रत्येक कारखान्याने एकूण गाळप केलेला ऊस व त्यानुसार जमा होणारी रक्कम याचा अनुषंगिक तपशील पडताळणी करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास उपलब्ध करून देतील, असाही उल्लेख या शासन निर्णयात करण्यात आला आहे.
राज्यातील प्रतिवर्षी गाळप होणाऱ्या ऊसाच्या प्रमाणात महामंडळास जी रक्कम जमा होईल त्या रक्कमेच्या सम प्रमाणात राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल; ही संपूर्ण रक्कम ऊसतोड कामगार, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या मुलांच्या उन्नतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून महामंडळामार्फत खर्च केली जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात आजपासून पुन्हा पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ९ जानेवारीला गारपिटीसह जोरदार पाऊसाची शक्यता
- सतर्क राहा! राज्यात ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
- राज्यात आजपासून ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 56 टक्क्यांनी वाढ; गेल्या २४ तासात इतक्या रुग्णांची वाढ
- थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे
- ‘या’ जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा ३० जानेवारी २०२२ बंद