अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले. मात्र, थंडी वाढत असल्याने काढणीयोग्य मालाला तडे जात आहे. ज्या बागांमध्ये १४ ब्रिक्सच्या पुढे उतरली आहे, अशा बागांमध्ये केसासारखे सूक्ष्म तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यामध्ये हवामानाच्या बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष उत्पादनांत मोठी घट झाली आहे.
जाणून घ्या टोळ मासा खाण्याचे फायदे….
त्यामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे. तर ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाश नसल्याने त्याचा मणी फुगवणीवर, साखर उतरण्यावर झाला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील अनेक बागांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे चालू वर्षी द्राक्ष उत्पादनांवर फटका बसत आहे.
अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांवर संकट
तापमान १० अंशाच्या खाली येत असल्याने या अडचणी प्रामुख्याने येत असल्याचे पाहायला मिळत आहे. जमिनीतून वेलीला होणारा फॉस्फरस पुरवठा कमी झाल्यामुळे साखर उतरण्याच्या प्रक्रियेत अडचणी तयार होतात. थंडी वाढल्यामुळे मण्यांचा आकार येण्यात परिणाम होण्याची शक्यता आहे.
थंडीत वाढ झाल्याने कापणी योग्य केळी जेमतेम तयार https://t.co/HUwOiv1eUs
— KrushiNama (@krushinama) January 13, 2020