राज्यात आता उसाच्या मळीच्या निर्यातीवर बंदी…

लातूर येथील पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती यामुळे यावर्षीच्या ऊस गळीत हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. मराठवाड्यातील बहुतांश कारखाने बंदच आहेत. त्यामुळे यावर्षी उसाचे गाळप अत्यंत कमी होणार आहे. त्याचा मळीच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. यावर्षी राज्यात फक्त 570 लाख मेट्रिक टनच उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे.

त्यापासून केवळ 22 लाख मेट्रिक टन मळीचे उत्पादन होणार आहे. आसवनी प्रकल्प, पशुखाद्य, इथेनॉलला लागणारी मळी पाहता यावर्षी किमान 18 लाख मेट्रिक टन मळीचा तुटवडा जाणवणार आहे. हे लक्षात घेऊन आता शासनाने यावर्षी मळीची परराज्यांत व परदेशात निर्यात करण्यावर बंदी घातली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलाच्या दृष्टीने मळी हा महत्त्वाचा स्रोत आहे. मळीचा वापर प्रामुख्याने मद्यार्क तयार करण्यासाठी केला जात आहे. राज्यात 231 साखर कारखाने कार्यान्वित आहेत. त्यापैकी 134 साखर कारखान्यांना आसवनी प्रकल्प आहेत. त्यापैकी 95 सहकारी क्षेत्रातील असून उर्वरित 39 खासगी क्षेत्रातील कारखाने आहेत. तसेच 19 स्वतंत्र आसवनी प्रकल्प आहेत.

राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम

ज्या साखर कारखान्याकडे आसवनी प्रकल्प नाहीत असे साखर कारखाने अन्य आसवन्यांना मळीची विक्री करतात. ज्या साखर कारखान्यांनी आसवनी उभारल्या आहेत त्यांनी त्याकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूकही केलेली आहे. या आसवनीत तयार होणाऱ्या मद्यार्काचा वापर राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि मद्यनिर्मितीसाठी होत आहे. मद्यार्काचे वापराचे प्रमाण 60ः40 आहे. यातून शासनास मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे.

मागील काही वर्षांतील राज्यातील मळीचे उत्पादन वार्षिक 35 ते 40 लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी राज्यातील आसवनींना मद्यार्क उत्पादनासाठी 32 लाख मेट्रिक टन मळीची आवश्‍यकता आहे. पशुखाद्यासाठी सुमारे अडीच लाख मेट्रिक टन मळीचा वापर केला जात आहे. तसेच वाहनाच्या इंधनात दहा टक्के या प्रमाणात इथेनॉल मिसळण्याचे धोरण आहे. याकरिता “बी’ हेवी मळी व “सी’ हेवी मळीचा वापर केला जात आहे.

आता केंद्र सरकार इजिप्त, तुर्कस्तानमधून १ लाख मेट्रिक टन कांदा करणार आयात

यावर्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील पूर आणि मराठवाड्यातील दुष्काळ पाहता 2019-20 मध्ये 570 मेट्रिक टन उसाचे गाळप होईल असा अंदाज आहे. त्यापासून 22.20 मेट्रिक टन मळीचे उत्पादन होणार आहे. म्हणजे यावर्षी सुमारे 18 लाख मेट्रिक टन मळीचा तुटवडा भासणार आहे. परिणामी मद्यार्क उत्पादन कमी होणार आहे. तसेच मद्यार्काचा वापर देशी, विदेशी मद्य, ईएनए तसेच इथेनॉल निर्मितीकरिता होत असल्याने तेथेही मद्यार्काचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे शासनाने यावर्षी मळीची परराज्यांत व परदेशात निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. राज्यातच सर्व मळीचा वापर केला जाणार आहे.