मुग लागवड पद्धत, माहित करून घ्या

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात. उडीद ही ७० ते ७५ दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी  ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत. जमीन – मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी … Read more

वाटाणे लागवड पद्धत, माहित करून घ्या

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. वाटण्याचे दाणे हवाबंद करून. गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवून त्यापासून डाळ बनविता येते. वाळविलेल्या अख्या वाटाण्यांचा उपयोग … Read more

इलायची लागवड, माहित करून घ्या

कोकणात जवळ-जवळ सर्व प्रकारची मसाल्याची पिके होतात. यापैकी वेलदोडा हे एक महत्वाचे पीक असून त्यास मसाला पिकांची राणी म्हणून संबोधण्यात येते. असे असले तरी वेलदोडयाच्या लागवडीपासून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी त्याची शास्त्रोक्त व सुधारीत पध्दतीने लागवड करणे महत्वाचे आहे. हवामान व जमीन – ज्या भागात किमान तपमान 10 अंश सें.ग्रे. व कमाल तपमान 35 अंश … Read more

मुळा पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान आणि जमीन

मुळा हेक्‍टरी प्रामुख्‍याने थंड हवामानातील पीक आहे. मुळयाची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाटयाने होते. परंतु चांगला स्‍वाद आणि कमी तिखटपणा येण्‍यासाठी मुळयाच्‍या वाढीच्‍या काळात 15 ते 30 अंश से. तापमान असावे. मुळयाच्‍या वाढीच्‍या काळात तापमान जास्‍त झाल्‍यास मुळा लवकर जून होतो आणि त्‍याचा तिखटपणाही वाढतो. मुळयाची जमिनीतील वाढ चांगली होण्‍यासाठी निवडलेली जमीन … Read more

काकडी पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान आणि जमीन

काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्ये दररोज उपयोग होतो. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते. काकडी हे उष्ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा उत्तम निचरा … Read more

पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड, जाणून घ्या

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी करावी. लसूणघास हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी महत्त्वाचे पीक आहे. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात. लसूणघास चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, … Read more

अळू लागवड तंत्रज्ञान, जाणून घ्या

अळू हे उष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते. उत्तर भारतात अळूच्या कंदांना‘आरवी’ असे म्हणतात. कोकणातील नारळ आणि सुपारीच्या बागेत तसेच परसबागेत अळूच्या पिकाची लागवड होत आहे. भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यामध्ये हे पीक घेतले जाते. उत्तर भारतात आळूच्या कंदांना ‘आरवी’ असे म्हणतात. आळू या … Read more

लागवड गवती चहाची, जाणून घ्या

गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. जमीन व हवामान – गवती चहासाठी निचरा होणारी, मध्यम काळी, पोयट्याची किंवा … Read more

ऍस्टर लागवड पद्धत, जाणून घ्या

 हे हंगामी फुलपीक असून त्यामध्ये पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात. ऍस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात मोठमोठ्या शहरांच्या भोवती केली जाते. ऍस्टरची फुले फुलदाणीत सजावटीसाठी तसेच हारांमध्ये वापरली जातात. ऍस्टरची फुले व कट फ्लावर म्हंणून तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरली जातात. बगीच्यामध्ये रस्त्यालगत तसेच कुंड्यांमध्ये ऍस्टरची लागवड केली जाते. हवामान व जमीन … Read more

कलिंगड/टरबूज व खरबूज लागवड पद्धत, जाणून घ्या

महाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. खरबुजाचे … Read more