डायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि अनस्यच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. यामुळे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने त्याचा चांगला फायदा होतो.पण अतिप्रमाणात खाणे देखील धोकायदायक आहे. हे नट्स शरीरासाठी फायदेशीर असतात, परंतू जर तुम्हाला डायबिटीज म्हणजेच मधुमेह आहे, तर तुम्हाला काही गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल.
जाणून घ्या लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे
बदाम
२०११ मध्ये मेटाबॉलिज्म नावाच्या जर्नलमध्ये छापलेल्या एका स्टडीनुसार बदाम, रक्तात ग्लूकोज लेवल मॅनेज करायला मदत करतो. स्ट्रेस कमी करायला पण मदत होते, जे मधुमेह आणि हार्टडिझीजजी प्रमुख कारणे आहेत. कच्चा बदाम खाणे चांगली गोष्ट आहे. रात्रभर भिजत ठेवल्यास उत्तम, खारे बदाम खाणे टाळा.
दुपारी जेवण झाल्यावर झोपल्याने होऊ शकतात ‘या’ व्याधी
अक्रोड
अक्रोडमध्ये जास्त कॅलरीज असतात. थोडेसे अक्रोड खाऊनही तुम्ही खूप वेळा उपाशी राहू शकता. यामुळे तुम्हाला थोड्या-थोड्या वेळात काही खाण्याची आवश्यकता भासणार नाही आणि शुगर कंट्रोलमध्ये राहिल. नाही खाल्ल्याने डायबिटीज होण्याची शक्यता कमी असते.
पिस्ता
पिस्तामध्ये खूप एनर्जी असते. यात खूप प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात. रिसर्चनुसार पिस्ता मधुमेह – ब्लड शुगर मेनटेन करायलाही मदत होते. खारे पिस्ता खाण्याचे टाळा. रोज फ्रूट सॅलेडसोबत जास्त पिस्ता खा.
वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी लाभदायक
शेंगदाणे
शेंगदाण्यात खूप प्रोटीन आणि फायबर असतात. शेंगदाने वजन कमी करायलाही मदत करतात आणि हृदयाचे आजार होण्याची शक्यता कमी होते. यामुळे मधुमेहच्या रुग्णाचे ब्लड शुगर कंट्रोल करायलाही मदत होते. पण अतिशेंगदाणे खाणे देखील चांगलं नाही.
मनुके
आंबट गोड चव असणारे आणि लहान आकाराचे मनुके आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात हे फारसे अनेकांना माहित नसते. ड्रायफ्रूटमधील मनुके बऱ्याच आजारांवरील रामबाण उपाय देखील ठरतात. लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर मनुके खाणे हे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. मनुकांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीरात अगदी सहजरित्या पचते. दररोज मनुके खाल्ल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
महत्वाच्या बातम्या –
रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता