आपली झोप कितीही झाली तरीही सातत्यानं आपल्याला थकल्यासारखं वाटत असतं. बऱ्याचदा आपल्याला काही काम न करताही थकवा जाणवतो. कधीकधी डोकं जड होतं तर काहीवेळा अंग दुखत राहातं. आपल्या शरीरातील ऊर्जा जास्त खर्च झाल्यानं सतत आपल्याला थकल्यासारखं होतं. काहीवेळा हा थकवा शरीरिक किंवा मानसिक दोन्ही प्रकारचा असू शकतो.
१. आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान रोज सकाळी 30 मिनिटं वेगवेगळे व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं.
2. तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दुग्धजन्य पदार्थांचा वापर नसेल तर शरीरात आवश्यक ती प्रथिनं जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीनं ऊर्जा मिळण्याचा स्रोत कमी होतो.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता का जाणवते ?
3. कुठल्याही प्रकारचं अगदी मद्य-सिगरेटपासून ते चहा कॉफीपर्यंत कोणतही व्यसन तुमच्या मेंदू आणि शरीरासाठी हानीकारक आहे. त्यामुळे तुमची झोप बिघडू शकते. आणि दिवसभर थकवा असल्यासारखं तुम्हाला जाणवू शकतं.
४. आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.
…..म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं
५. तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात असाल किंवला आर्थिक अडचण असेल किंवा कामाच्या ठिकाणचा ताण असेल या सगळ्या वातावरणामुळे तुम्ही मानसिकरित्या थकता. मेंदूला रिफेश होण्याची गरज असते. अशावेळी तुम्ही मेंदूवर अधिक ताण दिला तर थकवा जाणवतो.
६. आपल्या आजूबाजूला अनेक नकारात्मक लोक असतात. नकारात्मक वातावरणात राहून तुम्ही सतत तसाच विचार करायला लागता. त्यामुळे आपला मेंदू आणि मन प्रसन्न राहात नाही. चिडचिड, राग, मत्सर, द्वेष यामुळेही मनसिकरित्या खचायला सुरुवात होते. अशावेळी लक्ष न लागणं, लक्ष विचलीत होणं आणि काही सुचत नाही म्हणून आळस येणं, अतिझोप येणं किंवा झोप उडणं असे प्रकार घडतात.
जाणून घ्या किवी खाण्याचे फायदे https://t.co/vjg3pUaTtG
— KrushiNama (@krushinama) January 8, 2020