राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट व्हावी व शेतकरी यश द्यावे – अजित पवारांचे विठ्ठलाचरणी साकडे

पंढरपूर – कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुख्मिणींची उजमुख्यमंत्री अजित पवार व पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांनी पूजा केली. यावेळी राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट व्हावी व शेतकरी व कष्टकऱ्यांना यश द्यावे, असे साकडे अजितदादांनी श्री विठ्ठल-रुख्मिणीला घातले.

मानाचे वारकरी कोंडीबा टोणगे, सौ.प्रयागबाई कोंडीबा टोणगे (जि. नांदेड) यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करुन परिवहन महामंडळाच्यावतीने देण्यात येणारी प्रवास सवलतीसाठीची पास सुपुर्द करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती.

याबाबात राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय विभागाने ट्विट करत माहिती दिली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार व सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न. राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट व्हावी व शेतकरी व कष्टकऱ्यांना यश द्यावे-उपमुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे. असे ट्विट केले आहे.

कोरोना सावटानंतर वारकाऱ्यांना वाऱ्यांना येता आले नाही. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं यंदा कार्तिकी सोहळ्यासाठी प्रशासनाने सशर्त मंजूरी दिली आहे. पंढरपूर यात्रेची आस लागलेल्या वारकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. गेली दोन वर्षे यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या वारकऱ्यांना यावेळी पंढरपूरच्या यात्रेला जाता येणार आहे. या यात्रेला किमान ५ ते ६ लाख भाविक उपस्थित होते. मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं ठेवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –