अक्रोड खाल्ल्याने नैराश्याचा धोका कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. दररोज अक्रोड खाल्ल्याने एकाग्रताही वाढत असल्याचे समोर आले आहे.चला तर मग जाणून घेऊ अक्रोड खाण्याचे फायदे….
- अक्रोड खाल्याने शरीरातील उर्जा वाढवण्यास तसेच मन एकाग्र होण्यासही मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- अक्रोडच्या सेवनाने मानसिक तणाव कमी होतो तसेच बुद्धी तल्लख होण्यासह मदत होते.
- अक्रोडचे सेवन केल्याने कॅन्सर, हृदयरोग आणि इतर काही आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते.
- अक्रोड खाल्याने कोलेस्ट्रोल कमी होते आणि हृदयासंबंधी आजारांपासून बचाव होतो.
- अक्रोड खाल्ल्याने कॅलरी संबंधीत समस्या कमी करण्यास देखील मदत होते.
- अक्रोडमध्ये कॅलरीज्, कार्बोहायड्रेट्स असतात जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात.
- हाडं आणि दात मजबूत करण्यासाठीही अक्रोडचे सेवन फायदेशीर ठरते.
- अक्रोडमुळे मधुमेहाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.
महत्वाच्या बातम्या –