पावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची रेलचेल सुरु होते. हिरवट-पिवळस सालं असलेली मक्याची कणसं अनेकांची लक्ष वेधून घेतात. धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे खासकरुन पावसाळ्यात मक्याच्या कणसांना जास्त मागणी असते. परंतु, सध्याच्या काळात बाराही महिने ही कणीस सहज उपलब्ध होत असतात. विशेष म्हणजे ही कणीस खाण्याचे काही फायदे आहेत. त्यामुळे चला तर मग आज जाणून घेऊयात मक्याचे कणीस खाण्याचे काही फायदे.
- मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारते.
- मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते.
- मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.
- मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो.
- अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या –