मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. मक्याचे मूलस्थान अमेरिका (मेक्सिको किंवा मध्य अमेरिका) हे असावे याबद्दल मतभेद असले, तरी सध्याच्या मक्याचा विकास त्याच्याशी संबंधित असलेल्या टेओसिंटे (यूक्लीना मेक्सिकांना; हिंदी व पंजाबी नाव मक्चारी) या वन्य जातीपासून आदिमानवाने उपयुक्त उत्परिवर्तनांनी (आनुवंशिक लक्षणांत बदल घडवून आणण्याच्या क्रियांनी) व सतत निवड पद्धतीने केलेल्या अभिवृद्धीतून झालेला असावा, हे मत बरेचसे मान्यता पावलेले आहे.
पोर्तुगीज लोकांनी सोळाव्या शतकाच्या सुरवातीला भारतात मक्याची आयात केली असे मानले जाते; परंतु त्याहीपूर्वी अरब-आफ्रिकनांच्या मार्फत त्याचा भारतात प्रवेश झाला असावा, असेही मानण्यात येते.
मका हे तृणधान्याचे पिक असुन त्याचे अनेक उपयोग आहेत. तसेच मक्यापासून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. धान्य ,चारा ,तसेच मकेपासून अनेक खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यासोबतच मक्याचा वापर भारतामध्ये जनावराचा चारा म्हणून केला जातो.
अमेरिकेत प्रथम गेलेल्या यूरोपियन लोकांनी मक्याला ‘इंडियन कॉर्न’ हे नाव दिले ते आजही ‘कॉर्न’ या संक्षिप्त रूपात प्रचलित आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की प्रोटीन हे मांसाहारमध्ये जास्त असते. पण आता तुम्हाला जास्त प्रोटीन मिळण्यासाठी मांसाहार आणि सप्लिमेंटसारख्या गोष्टींची गरज नाही. मका खाण्याचे अनेक फायदे आहेत. मक्यातून प्रोटीन, कार्बोहायड्रेड, फायबर, विटामिन अशा अनेक गोष्टी मिळतात.
PROTEIN : प्रोटीनसाठी मांसाहार, सप्लिमेंटची गरज नाही, मक्याच्या नव्या वाणात 250 टक्के जास्त प्रोटीन
आता आपल्याला मक्यातच भरपूर प्रोटीन मिळणार आहेत. कारण भारतीय संशोधकांनी मक्याचा एक नवा वाण शोधला आहे की त्या वाणात तब्बल 250 टक्के जास्त प्रोटीन आहे. भारतीय संशोधकांनी आता बायोफोर्टीफायड मक्याचा शोध लावला आहे. तसेच वाराणसीतील काशी विश्व विद्यालयातील संशोधकांनी या नव्या वाणाला ”मालवीय स्वर्ण मक्का वन” हे नाव दिलं आहे. या मक्याच्या नव्या वाणातून पूर्वीपेक्षा 250 टक्के जास्त प्रोटीन मिळणार आहे.
तसेच आपल्यातील खूप जणांना बॉडीबिल्डिंगचा नाद असतो. अनेकजण बॉडीबिल्डिंगच्या नादात सप्लिमेटचा वापर करातात. मात्र खूप वेळेस त्या सप्लिमेटचा अत्यंत दुष्परिणाम झाल्यााचे आपण पहिले आहेत. आता आपल्याला त्यासाठी ह्या नव्या मक्याच्या वाणाचा खूप फायदा होणार आहे. या नव्या मक्यामुळे तुमची सप्लिमेंटपासून कायमची सुटका होऊ शकते आणि तुम्हाला आता त्यासाठी सप्लिमेंटची गरज नाही. तुम्हाला या मक्यातून पुरेसे प्रोटीन मिळणार आहे.
आपल्या देशात शाकाहारी असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शाकाहारी लोकांना कमी प्रोटीन मिळतं. त्याच्यासाठी ही मका आता खूप फायदेशीर ठरणार आहे. ही मका शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि कॅल्शियम वाढवण्यासही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
- राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत
- आनंदाची बातमी – एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदान पुन्हा सुरू
- एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रूपयांपर्यंत वाढ – अनिल परब यांची घोषणा
- राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान
- केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय, जाणून घ्या