‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये

मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन योजना ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी(Farmers) केंद्र सरकारची योजना आहे. किसान मान-धन योजनाचा लाभ घेणार्‍या सदस्याने पेन्शन फंड अंतर्गत नोंदणी केली आहे, जो भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे व्यवस्थापित केला जातो. त्याची एलआयसी बनते

देशातील मोदी सरकार  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे.  शेती उत्पादन वाढीबरोबरच इतर माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकास व्हावा या दृष्टीने (PM Kisan Maandhan Yojana) पंतप्रधान शेतकरी मानधन योजना ही सुरु करण्यात आली आहे. तर या  पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेत देशातील सध्या कोट्यावधी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळणार आहेत. म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये

पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेअंतर्गत पेन्शन 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी या मिळणार आहे. पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेत शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागणार आहेत. यानंतरच शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेसाठी कसा करावा अर्ज? चला तर मग जाणून घेऊ…..

पंतप्रधान शेतकरी मानध योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम त्याच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) जावे लागणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना तेथे सर्व कागदपत्रे सादर करून बँक खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांचे  कॉमन सर्व्हिस सेंटर आधार कार्डला तुमच्या अर्जाशी जोडेल. यानंतर शेतकऱ्यांना  किसान कार्ड पेन्शन अकाउंट नंबर दिला जाईल. नंतर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी स्वत:ची नोंदणी करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –