लातूर – जिल्हयामध्ये आंबा पिकाचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे आंबा पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव आढळुन येतो या किड व रोगामुळे होणारे नुकसान कमी करणेसाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे .या साठी जिल्हयमध्ये चाकुर , औसा , उदगीर, व लातुर या तालुक्यामध्ये कृषि विभागामार्फत आंबा पिकावरील किड व रोगाचे नियतीपणे सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्य आधारे पिक संरक्षक उपयायोजना प्राप्त होतात .
सध्यपरीस्थीतीमध्ये आंबा पालवीवरील तुडतुडयांचा प्रादर्भाव आढळुन आल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आंबा पालवीवरील फुलकिडयांनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के २ ग्रॅम प्रति १०लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
आंबा बागांमध्ये भुरी व करपा रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेडॅझीम १२% + मॅन्कोझेब ६३% १० ग्रॅम प्रती १० लि. पाण्यातून फवारणी करावी असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
- मोठी बातमी – आज मंत्रिमंडळाची बैठक; राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढणार का ?
- पुढील दोन ते तीन दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- राज्यातील ‘या’ भागात २७ ते ३० एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य
- हजारो गरजूंना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ – यशोमती ठाकूर