बाराही महीने मिळणाऱ्या फळांपैकी एक फळ म्हणजे केळी. केळी खाण्याचे आरोग्यदाई फायदे आजवर अनेकांनी तुम्हाला सांगितले असतील. पण, तुम्हाला माहिती आहे का, केवळ केळीच नव्हे तर, केळीची सालही तितकीच आरोग्यदाई असते. केळीच्या सालीचे फायदे तुम्ही जर जाणून घ्याल तर, केळी खाण्याऐवजी तुम्ही सालीच खाल. इतकी केळीची साल गुणकारी असते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..
- केळ्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने डाग दूर होतात. तसेच त्वचेमध्ये चमक येते.
- तुमाला दृष्टीदोषाचा त्रास असेल, त्यामुळे चष्मा वापरण्याची वेळ तुमच्यावर आली असेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ल्यूटीन असते. जे डोळयाची नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते.
- केळ्याची साल चामखीळवर रगडल्याने ते दबून जातात.
- जर तुम्हाला योग्य प्रकारे झोप येत नसेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ट्रिप्टोफेन नावाचे एक केमिकल असते. जे तुमची झोप चांगली आणि आरोग्यदाई करण्यासाठी मदत करते.
- केळ्याची सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर रगडा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.
महत्वाच्या बातम्या –