कैरी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. कैरी फक्त खाण्यासच चांगली लागत नाही तर कैरीचे आरोग्य फायदेसुध्दा आहेत. पिंपल्स, उष्मघात, अपचनाची समस्यां यासाठी कैरी एक उपयोगी फळ आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे…….

 • रक्तदाब नियंत्रणात राहतो
  कैरीमध्ये पोटॅशियमचा मुबलक साठा असतो. यामुळे इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण राखण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृद्यविकारांचा धोकाही कमी करता येतो.
 • हीट स्ट्रोक
  कुलिंग एजंट प्रमाणेच कच्ची कैरी शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोकचा त्रास जाणवत असल्यास कैरीचे पन्हे प्यावे.
 • पचन सुधारते
  कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा किंवा मसालेदार पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून डाळीमध्ये, आमटीमध्ये कैरीचा समावेश करावा.
 • पिंपल्स कमी होतात
  कच्च्या कैरीमधील अ‍ॅस्ट्रींजंट गुणधर्म त्वचेवर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही. एक कप पाण्यात कैरीची फोड उकळा. ते पाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर लावा. दुसर्‍यादिवशी उठल्यावर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवा. फरक जाणवेल
 • त्वचेचे आरोग्य सुधारते
  कैरीतील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तसेच यामुळे एजिंगची समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी कैरी खावी.

महत्वाच्या बातम्या –