Share

मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी, जाणून घ्या

Published On: 

मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. इटलीच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यांचा निदर्शनास असे आले की जी लोकं आठवड्यातून चारपेक्षा जास्तवेळा मसाल्याचे पदार्थ खातात. त्यांच्यात हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्यांची संख्या ४० टक्के कमी होती. तेच मिरची न खाणाऱ्या लोकांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त होते.

मागिल ८ वर्षापासून इटलीच्या पॉरज़िल्ली मध्ये न्यूरोमेड न्यूरोलॉजिकल इंस्टीट्यूट येथिल तज्ञांनी हेल्दी आणि अन्हेल्दी आहार घेत असलेल्या लोकांचे निरीक्षण केले. ज्यात असं दिसून आलं की मिरची खाणारे लोक हे मिरची न खाणाऱ्यांच्या तुलनेत अधिक सुदृढ आहेत.

तसंच हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी६, लोह, पॉटेशियम, आणि कर्बोदकाचा समावेश असतो. ज्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणं गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या