राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यात २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १५३ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ७८ खासगी व या मध्ये राज्यातील ७५ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८०.९९ लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे.
राज्यात २५ नोव्हेंबर पर्यंत तब्बल १६२.३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती मिळाली आहे, तर राज्याचा सरासरी साखर उतारा ८.९७ टक्के इतका आहे.
राज्यात यावर्षी २५ नोव्हेंबरपर्यंत सर्वाधिक ३७ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, राज्यात यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ४२.९६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ३४.९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर उतारा ८.१४ टक्के आहे.
- हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा – उद्धव ठाकरे
- राज्यातील द्राक्षे, नारळ, केळी, ड्रॅगन फ्रुट यांसह फुलांचा रोजगार हमी योजनेत समावेश – संदिपान भुमरे
- हवामान विभागाचा मोठा अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- प्रत्येक मंदिरासमोर कासव का असते? जाणून घ्या