राज्यातील शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरलाच सुरु होणार? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे दिली ‘ही’ माहिती

मुंबई: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिली आहे. तर यातच कोरोनाचा एक नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट विषाणू आला आहे.

ओमायक्रॉनसंदर्भात (Omycron)अजून तरी आपल्या राज्याला भीती नाही. कारण, त्याची कुठेही लागण झाल्याचे अजून दिसले नाही. तसेच ज्युनोमिक परिस्थितीचाही तसा अहवाल नाही. त्यामुळे राज्यातील शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरलाच सुरु होतील. असे विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे.

राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा संचालनालयाकडून जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका स्तरावर या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यात दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर, शाळेत मास्क घालणे बंधनकारक, वैयक्तिक आणि शाळेत स्वच्छता, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे आता राज्यातील शाळा १ डिसेंबरलाच उघडणार आहेत. दरम्यान गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी त्याची धास्ती घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या –