सगळे किंवा डॉक्टर आपल्याला सांगत असतात. मोड आलेले कडधान्य शरीरासाठी उत्तम असतात. त्यामुळे शरीराला हवी ती प्रथिने मिळू शकतात. मोड आलेले धान्य पौष्टीक आणि चविष्ट लागतात. मोड आलेली धान्ये हा सर्वोकृष्ट आहार समजला जातो. कडधान्ये मोड आणून शरीरासाठी उत्तम खाण्याची पध्दत खरंच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची वाढ होते. क-जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये तीन अशोषक द्रव्ये असतात. टॅनीन, फायटीक अॅसीड आणि ट्रिप्सीन इनहीबीटर हे द्रव्ये आहेत. महाराष्ट्रमध्ये कडधान्यांना मोड आणून खाण्याची जुनी आणि चांगली परंपरा आहे. त्यामुळे काही विशिष्ट विकरे उत्तेजीत होतात आणि त्यांच्यामुळे चांगले बदल घडवून येतात. डायट फॉलो करयाचं असेल तर मोड आलेले कडधान्य खाल्लेले चांगले असतात.
स्प्राऊट्स खाल्याने आपल्याला काय फायदा होतो –
- तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर आहारात मोड आलेले कडधान्यांचा समावेश करा. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मोठया प्रमाणावर फायबर असतात. त्यामुळे पोट भरते आणि लवकर भूक लागत नाही.
- तुमच्या सकाळच्या नाष्ट्यामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल आणि तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.
- मधूमेह असणाऱ्या लोकांनी मोड आलेल्या मेथी दाण्यांचा आहारात वापर करावा. तसेच स्प्राऊट्समुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत करते.
- स्प्राऊट्समधील व्हिटॅमिन आणि मिनरल्स तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात.
कसे बनतात मोड आलेले कडधान्ये –
धान्य किंवा कडधान्याला मोड येण्यासाठी पाण्यात भिजत घालावे. जवळपास 6 ते 7 तास ते कडधान्यं घालावे. त्यानंतर ते भिजलेले कडधान्यं भुगते. नंतर भिजवलेलं धान्य हे एका स्वच्छ कापडामध्ये रात्रभर बांधून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या धान्याला मोड फुटतात.
स्प्राऊट्स खाण्याची योग्य वेळ –
सकाळी नाश्ता करताना स्प्राऊट्स खाणे चांगले असते. सकाळी स्प्राऊट्स खाल्याने तुम्हाला दिवसभर वारंवार भूक लागत नाही.
- सावधान! राज्यातील ‘या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरू
- शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा – दादाजी भुसे
- कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपा
- पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे सुनील केदार यांचे आवाहन
- प्रसारमाध्यमांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे – दत्तात्रय भरणे