त्वचेच्या खाजेची समस्या अनेक कारणांनी उद्भवू शकते. बहुतांश वेळा अलर्जी, स्किन रॅशेस आणि डर्माटायटिस म्हणजेच त्वचारोगामुळे उद्भवते. ही समस्या संपूर्ण शरीराला किंवा शरीराच्या विशिष्ट अवयवालाही असू शकते. खाज ही एका सूक्ष्म विषाणूंचा (मायक्रोब) परिणाम असल्याचे अलोपथीमध्ये मानण्यात आले आहे.
त्वचेची खाज म्हणजेच वैद्यकीय भाषेत ‘प्रूरिट्स’ होय. त्वचा खाजणे म्हणजेच ‘इचिंग’ सुरू होताच अनेकदा स्वतःला ओचकारून घेण्यापर्यंत मजल जाते. त्वचेच्या खाजेची समस्या अनेक कारणांनी उद्भवू शकते. खाज जर वारंवार येत असेल तर ते मूत्रपिंड किंवा यकृताचे दुखणेही असू शकते. अर्थात स्किन इचिंगची समस्या बहुतांश वेळा अलर्जी, स्किन रॅशेस आणि डर्माटायटिस म्हणजेच त्वचारोगामुळे उद्भवते. ही समस्या संपूर्ण शरीराला किंवा शरीराच्या विशिष्ट अवयवालाही असू शकते. खाज ही एका सूक्ष्म विषाणूंचा (मायक्रोब) परिणाम असल्याचे अलोपथीमध्ये मानण्यात आले आहे. अनेक दिवस अंघोळ न करणे, त्वचेवर धूळ-माती जमणे अशा कारणांमुळेही खाजेची समस्या उद्भवते. खाज हा स्वतंत्र आजार नाही, असे डॉक्टर मानतात. शरीराला झालेल्या अन्य आजारांमुळे त्वचा रुक्ष होऊन खाजेची समस्या सुरू होते. रक्तसंक्रमणामुळेही फोड आणि पुरळ येऊन खाज सुरू होते. खाजेचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत.
पुरळ नसलेली खाज हा एक प्रकार असून, या प्रकारच्या खाजेमुळे अन्य लक्षणे दिसून येतात. या प्रकारची खाज संपूर्ण त्वचेवर किंवा डोके, चेहरा, पाय, बोटे, नाक, हात किंवा जननांगाजवळ होते. ही खाज कोरडी किंवा ओलीही असते. शुष्क त्वचा असल्यास खाजेची शक्यता अधिक असते. अशा व्यक्तींना अनुकूल तापमान नसल्यास लगेच खाज सुरू होते. उन्हाळ्यात अधिक तापमान वाढल्याने घाम येतो. बाहेरून घरी आल्यावर संपूर्ण शरीर घामाने निथळत असते. परंतु पंखा, एसी, कूलरमुळे घाम अंगावरच वाळतो आणि खाज सुरू होते. थंडीत त्वचा रुक्ष होऊन फुटते आणि खाज सुरू होते, तर उन्हाळ्यात घामोळे येऊन खाज सुरू होते.
अनेकदा त्वचेच्या आजारांमुळे खाजेची समस्या उद्भवते. उदाहरणार्थ, डर्माटायटिसमध्ये त्वचेला सूज येऊन खाज सुरू होते. सोरियासिस या रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे उद्भवणार्या त्वचाविकारात त्वचा लाल होते व त्वचेचा दाह होतो. चिकनपॉक्स, खसरा, उवा, पाइनवर्म अशा अनेक जंतूसंसर्गामुळे खाज उद्भवते. तसेच लघवी केल्यानंतर जननांग पाण्याने स्वच्छ न केल्यास जीवाणूंचे संक्रमण होऊन खाज उद्भवते. स्त्री-पुरुषांच्या डोक्यात उवा झाल्यानेही खाज होते. पायर्या चढताना किंवा रस्त्यावरून चालताना तापमान अधिक असेल तरी खाज सुरू होते. सुरुवातीला खाजेचे प्रमाण कमी असते. परंतु जोराने खाजविल्याने त्वचा लाल होते. त्वचेवर पुरळ उठते. कंबर, छाती, बगल, मांड्या आणि बेंबीच्या आसपास खाजेची समस्या उद्भवते.
खाजेपासून बचावासाठी टिप्स
- त्वचा आर्द्र राखण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा.
- खाण्याचा सोडा खाजेची समस्या कमी करतो.
- अँटी इचिंग ओटीसी क्रीमचा वापर करावा.
- रक्तसंसर्गामुळे खाज होत असल्यास कडुलिंबाची पाने आणि काळ्या मिरीची पूड पाण्यातून उकळून सेवन करावे.
- कडुलिंबाची पाने उकळून गाळून त्याने स्नान केल्यास खाज कमी होते.
- खोबरेल तेलात कापूर मिसळून मालिश केल्यास फरक पडतो.
- कडुलिंबाच्या झाडावरच पिकलेल्या लिंबोळ्या खाल्ल्याने फायदा होतो.
- सकाळ-संध्याकाळी टोमॅटोचा रस सेवन केल्यास खाज कमी होते.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने अलर्जी रोखणारे औषध घ्यावे.
- फळे आणि भाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे.
- खाज आल्यास जास्त खाजवू, ओचकारू नये.
- साबण, डिटर्जंट आणि परफ्यूमपासून दूरच राहा..
चर्मरोगनाशक तेल
हे तेल घरच्या घरी बनविता येण्याजोगे आणि खूपच फायदेशीर असते. या तेलाने झोपण्यापूर्वी आणि अंघोळीपूर्वी मालिश केल्यास चमत्कार घडेल. कडुलिंबाची साल, रक्तचंदन, हळद, हिरडा, बेहडा, आवळा, अडुळसा पाने समप्रमाणात घेऊन पाण्यात पाच ते सहा तास भिजवून ठेवावे. पिसून त्याचा कल्क बनवावा. नंतर त्याच्या चौपट तिळाचे तेल त्यात ओतावे. मंद आचेवर हे मिश्रण बराच वेळ उकळावे. पाण्याची वाफ होऊन केवळ तेलच उरले पाहिजे. हे तेल बाटलीत भरून ठेवावे. ज्या भागात खाज येत असेल, तेथे हे तेल लावावे.
अशुद्ध रक्तामुळे खाज येत असेल तर हा आजार बळावण्यापूर्वीच खाण्या-पिण्यावर नियंत्रण आवश्यक आहे. मीठ कमी खावे. आजार वाढल्यास मीठ पूर्ण बंद करावे. तसेच चिंच, लोणचे, लिंबू, टोमॅटो, तेल, लाल मिरची, चहाही वर्ज्य करावा. हा एक संसर्गजन्य आजार असून, एकापासून कुटुंबातील दुसर्याला होऊ शकतो. गरम पदार्थ खाणे, स्पर्श, श्वासातून विषाणूंचे वहन, चुकीच्या पद्धतीने दिलेले इंजेक्शन, दारू, गुटखा, पान-तंबाखू आदींमधून हा आजार संक्रमित होतो. त्वचेवर लाल रंगाचे पुरळ येते आणि खाजेचे प्रमाण वाढत जाते. पुरळ किंवा फोड उकलल्यास लाल रंगाचे पाणी निघते. रात्री तांब्याच्या भांड्यात थोडे दही ठेवल्यास ते सकाळी थोडे निळसर दिसू लागते. त्याच भांड्यात दही थोडावेळ फेटून खाज होत असलेल्या ठिकाणी लावावे. काही दिवस कडुलिंबाच्या पानाचा चमचाभर रस सकाळी घ्यावा. चार-पाच लिंबोळ्या खाऊन त्यावर पाणी प्यावे. दोन चमचे तुळशीचा रस आणि दोन चमचे लिंबाचा रस एकत्र करून कापसाने खाजेच्या ठिकाणी लावावा. जिर्याची वस्त्रगाळ पूड पाण्यात घट्ट मिसळून खाजेच्या ठिकाणी लावावी. गव्हाच्या आट्यात तिळाचे तेल लावून खाजेच्या ठिकाणी लावल्यासही फायदा होतो. खाजेच्या ठिकाणी मध लावले तरी दाह कमी होतो. कोरड्या खाजेवर केळ्याच्या पानांची राख आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण लावल्यास फायदा होतो. केळी कुस्करून त्यात लिंबाचा रस मिसळून खाजेच्या ठिकाणी मलमाप्रमाणे लावावे. सालीसकट मुगाची डाळ दळून दह्यात मिसळून खाजेच्या ठिकाणी लावावी. खोबरेल तेलात लिंबू पिळून मालीश केल्यासही खाज कमी होते. तसेच चमेलीच्या तेलातही लिंबू पिळून मालीश करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी
- काळ्या मानेपासून ५ मिनिटात मिळवा मुक्तता, जाणून घ्या घरगुती उपाय….
- जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’
- सावधान! जिल्ह्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा