कर्जमाफीच्या यादीत नावे तर आली, पण माणूस कुठून आणायचा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी ही २४ फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. त्यामध्ये ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्ज खाती जाहीर करण्यात आली होती. कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी ही राज्य सरकारने शनिवारी प्रसिद्ध केली आहे.  या यादीमध्ये २१ लाख ८२ हजार जणांचा समावेश आहे.

चांगली बातमी ; आता सातबाऱ्यावर होणार चंदनाची नोंद

तसेच पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना लाभ मिळायलाही सुरुवात झाली. पण पहिल्या यादीतील काही शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा बँक खात्याशी जुळत नसल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक हे दुरुस्त करण्यात आले. पण, हे दुरुस्त करण्यात आलेले क्रमांक शासनाच्या सर्व्हरवर अपलोड करणार कोण, असा प्रश्न आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे मानसिक नैराश्य, 24.7 टक्के शेतकरी नैराश्यग्रस्त

हे असतानाच पहिल्या यादीत एकट्या वर्धा जिल्ह्यातील चार मृत शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही कर्जमाफी मिळावी यासाठी काही प्रोसेस करावी लागत आहे. पण जर यादीत मृत शेतकऱ्यांचा समावेश असेल तर कसे करावे हा प्रश उभा राहिला आहे. कर्जमाफीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी सर्व्हरवर अंगठा ठेवावा लागतो. शेतकरीच जिवंत नाही तर त्यांचा अंगठा कुठून आणायचा असा प्रश्न त्यांच्या वारसांसमोर निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांवर आता ” कोणी डॉक्‍टर देता का डॉक्‍टर” अशी म्हणण्याची वेळ आली

पहिल्या यादीतील १६६ शेतकऱ्यांपैकी १५४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. बाकी असलेल्या १२ शेतकऱ्यांपैकी आठचे आधार क्रमांक चुकीचे तर चार शेतकरी मृत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये लोणी येथील शेतकरी कवडू सपाट, लोणीचे भगवान पिंपळकर, येनगावच्या सुलोचना धारपुरे, नत्थू पाटील यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतकरी कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी आहे, आम्ही सरकारचा निषेध करतो – प्रविण दरेकर

शेतकऱ्यानं केला चमत्कार; ४० दिवसांत कलिंगडामधून तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचं उत्पन्न