चांगली बातमी ; आता सातबाऱ्यावर होणार चंदनाची नोंद

चंदन (इंग्लिश: Santalum albumसांटालम आल्बम ; इंग्लिश: Indian sandalwoodइंडियन सँडलवूड 😉 हा छोट्या आकारमानाचा उष्ण कटिबंधीय वृक्ष आहे. याचे खोड सुगंधी आणि थंड असते. मूलतः भारतीय उपखंडातून उद्भवलेला हा वृक्ष आता भारतीय उपखंड, चीन, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपिन्स व वायव्य ऑस्ट्रेलिया या प्रदेशांत याची लागवड केली जाते. हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या काहीशा नाजूक, खाली झुकलेल्या असतात.

अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी ठोस तरतूद दिली गेली नाही – राजू शेट्टी

चंदन फक्त थंडावाच देत नाही तर हे एक औषधही आहे. कोरड्या शुष्क त्वचेसाठी चंदन वरदान आहे. चंदनाचा वापर साबण, डिटर्जेंट, कॉस्मेटिक, परफ्यूम, आफ्टर शेव, उदबत्ती बनवण्यासाठी केला जातो. चंदनाचे तेल व पावडरही बाजारात मिळते. पण एवढे महत्व असणाऱ्या या चंदनाची सातबाऱ्यावरती नोंद नाही.

मानसिक थकवा दूर करतात हे आयुर्वेदिक तेल,कुठले ते पाहा

त्यामुळे आता चंदनाही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सातबाऱ्यावर उताऱ्यावर आता चंदनाची नोंद केली जाणार आहे. याबद्दल कृषिमंत्री दादा भुसे यांनी सचिवांना आदेश दिला आहे.

कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचे “ट्‌विटर मिशन”

दोन वर्षापूर्वी चंदनाचा समावेश हा अनुदानात करण्यात आला होता. पण त्याचा औषधी वनस्पती मध्ये समावेश नव्हता. त्यामुळे चंदन उत्पादक शेतकरी हे या अनुदानापासून वंचित होते. हे अनुदान कृषी विभागाने दोन वर्षापासून रोखले होते. पण आता कृषिमंत्र्यांनी सचिव एकनाथ डवले यांना चंदन शेतीला अनुदान देण्याचे आदेश दिले. चंदनाचा समावेश केल्याने शेतकऱ्यांना हेक्टर ५८ हजार रूपये अनुदान मिळणार आहे. पूर्वी तलाठी कार्यालयात चंदनाची सातबारा उताऱ्यावर नोंद घेत नव्हते पण आता याची नोंद ही सातबारा उताऱ्यावर होणार आहे. तसेच महाराष्ट्रात गेल्या चार वर्षापासून शेतामध्ये चंदन लावणा-या शेतक-यांची संख्या वाढत आहे.

महत्वाच्या बातम्या –

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

अशा बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम कृषी मुल्य आयोगाने करू नये – राजू शेट्टी