अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं पाहायला मिळतं. हिंदू संस्कृती मानणाऱ्या अनेक कुटुंबात तुळशीचं खास महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते.
- तुळस दिवसभराचा थकवा दूर करते
- अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.
- तुळशीत मोठ्या प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात.
- दररोज तुळशीची पानं खाल्ल्याने फ्लूचा धोकाही दूर होण्यास मदत होते.
- तुळशीचा काढा सर्दी-खोकल्यावर रामबाण मानला जातो. काढा बनवण्यासाठी तुळशीची पानं पाण्यात टाकून त्यात काळी मिरी आणि खडीसाखर मिसळून त्याचे सेवन करा. सर्दीसाठी हा काढा अतिशय गुणकारी ठरतो.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुढील ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- मोठी बातमी – राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा लवकरच सुरु होणार
- महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार; वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या पुरस्कारांचे वितरण
- कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटपाची कार्यवाही तात्काळ करावी – विजय वडेट्टीवार
- ‘कोविशिल्ड’ लसीच्या दोन मात्रांतील अंतर कमी करा – राजेश टोपे यांची केंद्रीयमंत्री मंडाविया यांच्याकडे मागणी