कांद्याची साल फेकून देण्याआधी ‘हे’ फायदे नक्की वाचा…

अनेकांना कांदे खाण्याची आवड असते. त्याशिवाय त्यांची जेवण जेवणे अपूर्ण राहते. लोक सहसा कांदा खातात परंतु कचरा म्हणून सोललेली साल फेकून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का कांद्याची साल देखील खूप उपयुक्त आहेत. चला तर मग जाणून घेऊ कांद्याच्या सालीचे फायदे…….

  • जर आपण सूपमध्ये कांद्याची साले वापरली तर त्याचे पोषण आणखी वाढवतो . एवढेच नाही तर आपण कांद्याच्या सालाने घरी बेक केलेला ब्रेडदेखील बनवू शकता.
  • दररोज 1 कप कांद्याच्या सालीचा चहा करून प्यायल्यास तुम्हाला पायाच्या दुखण्यामध्ये आराम मिळू शकतो.
  • कांद्याच्या सालीमध्ये क्वॅरसेटीन नावाचे फ्लेनोवल असते. यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
  • कांद्याच्या सालीमध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. पायाला खाज किंवा कोणत्याही प्रकारचा किडा चावला असल्यास कांद्याच्या सालीचा खूपच फायदा होतो
  • घशातील खवखव कमी करायची असेल तर पाण्यामध्ये कांद्याची सालं मिसळा. गाळलेले पाणी गुळण्या करण्यासाठी वापरा. यामुळे घशातील खवखव कमी करण्यासाठी मदत होते.
  • जर आपल्याला केसांशी संबंधित समस्या दूर करायच्या असतील तर कांद्याच्या सालीचा चहाने आपले केस धुवा. यामुळे केसांमधील कोंडा होण्याची समस्या दूर होते. फक्त हेच नाही तर आपले केस लांब, काळे आणि दाट होतील.

महत्वाच्या बातम्या –