पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उघड्यावरचे पदार्थ खाल्याने जंतू संसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ खाणे टाळावे. अनारोग्य निर्माण करणारे उघड्यावरचे पदार्थ खाल्याने जंतू संसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात.
- या दिवसात सॅलेड खाणं टाळावं.
- पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने हिरव्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे पालेभाज्या खाणे टाळल्या पाहिजेत.
- कापल्यानंतर फळं लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते.
- पचनास जड असणार्या फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाऊ नयेत.
- पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तेलकट, तळकट पदार्थ खाऊ नयेत.
- शीतपेयांमध्ये शरीरातल्या खनिजांचं प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो.
- पावसाळ्यात भात खाल्ल्याने अंगावर सूज येण्यासोबतच पोट फुगतं. त्यामुळे भात प्रमाणात खावा.
- मीठामळे पोट फुगतं आणि भूक जास्त लागते. त्यामुळे या दिवसात मीठही कमीच खावं.
- दह्यामुळे पावसाळ्यात कफ होतो.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा…
- सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे काय आहेत फायदे , घ्या जाणून …
- सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’
- पुदिन्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही कधी ऐकले आहे का?
- सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय ! जाणून घ्या
- शेतकऱ्यांना पीकविमा देण्यास टाळाटाळ; पीकविमा कंपनीसह केंद्र व राज्य सरकारला नोटीस