कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे…
- कांद्याच्या रसात नैसर्गिक साखर, व्हिटॉमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यात मिनरल्स, सोडिअम, पोटॅशिअम, आयर्न आणि फायबर्सचेही मुबलक प्रमाण असते. त्याचबरोबर यात फॉलिक अॅसिडही असते. फॉलिक अॅसिडची गरज प्रेग्नंसीमध्ये
- कांद्याच्या रसात फायटोकेमिकल असते. त्यामुळे शरीरात व्हिटॉमिन सी चे प्रमाण वाढते. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसंच अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी कांदाचा रस फायदेशीर ठरतो.
- कांद्याच्या रसात अँटी बायोटिक, अँटी सेप्टिक आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरात होणारे इंफेक्शन दूर होते. त्याचबरोबर शरीरातील विषद्रव्ये कमी करण्यास याचा फायदा होतो.
- अॅसिडिटीवर आराम मिळण्यासाठी कांदाचा रस उपयुक्त ठरतो. त्यासाठी कांद्याच्या रसात, थोडं आलं-लसणाचा रस घाला. त्यात १ चमचा मध आणि २ चमचे पाणी घाला. मिश्रण तयार करा आणि दिवसातून एकदा घ्या. त्यामुळे गॅसपासून सुटका होईल.
- कांद्यात क्रोमियम असते त्यामुळे शरीरातील रक्तसंचार सुरळीत राहतो. त्याचबरोबर ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते. परिणामी हृदयाचे आरोग्य राखले जाते.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरू
- शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा – दादाजी भुसे
- कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपा
- पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे सुनील केदार यांचे आवाह