दिली – गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर देशात गेल्या २४ तासात 415 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार देशात सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 99 हजार 974 झाली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 70 हजार 530 झाली आहे. तर देशात आतापर्यंत तब्बल 3 कोटी 40 लाख 53 हजार 856 रूग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.
देशात आतापर्यंत तब्बल 126 कोटीपेक्षा अधिक लसींचे डोस देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. तर देशात गेल्या २४ तासात 73 लाख 63 हजार 706 डोस देण्यात आले. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार 126 कोटी 53 लाख 44 हजार 975 लसीचे डोस देण्यात आले आहेत.
- सावधान! राज्यातील ‘या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरू
- शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा – दादाजी भुसे
- कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपा
- पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे सुनील केदार यांचे आवाहन
- प्रसारमाध्यमांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे – दत्तात्रय भरणे