केंद्राचा मोठा निर्णय: प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांवर किमान 90 ते 100 कोटीं रुपयाचा खर्च करणार

नवी दिल्ली – देशातल्या आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियान सुरू करण्यात आलं आहे. त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांवर किमान 90 ते 100 कोटीं रुपयाचा खर्च केला जाईल,असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली इथं काल या योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या अभियानांतर्गत 134 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या जिल्हास्तरावर मोफत उपलब्ध होणार आहेत. अभियानासाठी कंटेनरवर आधारित रेल्वेगाड्यांमध्ये 2 रुग्णालयं सुरू केली जाणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, देशाच्या ज्या कोपऱ्यात वैद्यकीय सुविधेची गरज असेल तिथे या रेल्वेगाड्या नेल्या जातील आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील. एका रेल्वेत 22 कंटेनर असतील आणि त्यात 100 खाटांची सुविधा उपलब्ध असेल. दक्षिण आशियामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची सुविधा उपलब्ध होणार आहे,अशी माहितीही मांडवीय यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –