Share

ऐन दिवाळीत एलपीजी सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

मुंबई – सर्वसामान्य दिवाळीवर चांगलीच संक्रांत आली आहे. महिन्याच्या आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीच्या बातमीने सर्वांवर मोठा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे.

ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब असून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या 14.2  किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांची दरवाढ झालेली नाही.

दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.

दरम्यान, या वाढीनंतर आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 2000 रुपयांच्या पुढे गेला आहे. पूर्वी तो 1733 रुपये होता. मुंबईत 1783 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलेंडर आता 1950 रुपयांना मिळणार आहे. त्याच वेळी, आता कोलकातामध्ये 19 किलोचा इंडेन गॅस सिलेंडर 2073.50 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये आता 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 2133 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या –  

मुख्य बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon